Jivaji Mahale - पैलवान जिवाजी_महार (Chhatrapati Shivaji Maharaj)
Jivaji Mahale उमरठ हे गाव तसं ३५० वर्षांपूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव. सुभेदार तानाजी मालुसरे यांचे हे गाव. गावात चारचौकी वाडा होता तानाजीरावांचा. आज गावची यात्रा भरली होती. गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती. राजांची आणि तानाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची. मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी. आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची, त्याचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर. आणि त्याच्याबरोबर लढणारा होता तो भिकाजी ढेरे . हा हिरडस मावळातला.वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल. वास्तविक सर्व जण शिवाजी राजांना पाहायला जमणार होते आणि का नाही जमणार ?? लेकीसुना, संत सज्जन ,गाई वासरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे. स्वराज्य आणले होते ..! मैदान खचाखच भरले होते. लहान मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला. आणि पूर्वेकडून दस्तुरखुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले. राजीयांनी पांढरा अंगरखा घातला होता. कृष्णा घोडीवर स्वार होते आणि कमरेला तलवार बांधल